Posts

Showing posts from November, 2021

हिरड्या मजबूत तर दात मजबूत

Image
  हिरड्या मजबूत तर दात मजबूत दातांसोबत हिरड्यांचं आरोग्यही महत्वाचं असतं , यावर दातांचं आरोग्य अवलंबून असतं . सर्वात महत्वाचं म्हणजे दातांची मजबुती ही स्वच्छतेवर अवलंबून असते . हिरड्या अस्वच्छ असतील , यामुळे दात तुटणे , रक्त येणे अशा अडचणी येतात .  जेवण केल्यानंतर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर अनेक जण दात स्वच्छ करत नाहीत . निदान चुळ भरणे   तरी    आवश्यक असते , ते देखील अनेक लोक करत नसल्याने , दातांवर घट्ट स्तर निर्माण होतो .  दातांना कीड लागते या जंतुमुळे दातांना कीड लागते . याचा परिणाम हिरड्यांवर होतो . हिरड्या सुजतात , हिरड्यातून रक्त येते किंवा दात आणि हिरड्यांमध्ये अंतर तयार होतं . यासाठी दातांची समस्या उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा . वेळेवर उपचार न झाल्यास हिरड्यांमध्ये पु सुद्धा होऊ शकतो . कच्च्या भाज्या चावून खा हिरड्या मजबूत ठेवण्यासाठी कच्च्या भाज्या चावून खाव्यात . ' सी ' जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे , यामुळे हिरड्या मजबूत होतात .