डेंटल इम्प्लांट्स: तिसऱ्यांदा येणारे दात
डेंटल इम्प्लांट्स: तिसऱ्यांदा येणारे दात मनुष्याला नैसर्गिक रीत्या दोन वेळा दात येतात. एक म्हणजे दुधाचे आणि दुसरे म्हणजे कायमस्वरूपी दात. दुधाचे दात पाचव्या-सहाव्या वर्षी पडून त्या जागी कायमस्वरूपी दात येणार असले, तरी दुधाच्या दातांचीही काळजी घ्यावी लागते आणि तेवढीच काळजी येणाऱ्या कायमस्वरूपी दातांचीही घ्यावी लागते. मात्र सतत गोड खाणे, योग्य रीत्या दात न घासणे, चुकीच्या सवयी आदींमुळे दात किडू शकतात, पडू शकतात. अशा वेळी दातांवर योग्य उपचार करून घेणे आवश्यक ठरते. पूर्वी दात पडला, की कवळी बसवावी लागायची. काळाबरोबर दंतवैद्यकशास्त्राने प्रगती केली. परिणामी, कवळीऐवजी पडलेला दात क्राउन व ब्रिजेस पद्धतीने बसवला जाऊ लागला. मात्र हे उपचार घेताना आजूबाजूचे दात घासून क्राउन व ब्रिजेस करावे लागतात. परिणामी, बाजूचे दात कमजोर होण्याची शक्यता असते. कालांतराने या क्राउन व ब्रिजेसची जागा डेंटल इम्प्लांटने घेतली. जो दात पडला आहे, केवळ त्याच जागी आधुनिक उपचारांच्या साहाय्याने दाताचे रोपण (इम्प्लांट) केले जाते. आधुनिक प्रक्रियेने करण्यात येणाऱ्या दातांच्या रोपणामुळे रुग्णांना तिसऱ्यांदा दात मिळणे शक्...