दातांची काळजी कशी घ्याल?

 


दातांची काळजी कशी घ्याल

दात किडणे, हिरड्यांची काळजी घेणे यामुळे हिरड्यांतून रक्तस्रावाबरोबरच हिरड्यांना सूज येऊ शकते. मधुमेह आणि दातांच्या आरोग्याचा विचार करताना मात्र काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

जोवर दाताचे दुखणे सुरू होत नाही, तोवर दातांची काळजी घ्यायची असते, ही संकल्पनाच मनात येत नाही. दातांची दैनंदिन काळजी घ्यावीच लागते; परंतु वयानुसार; तसेच विविध आजारपणांमध्ये दाताची विशेष काळजी घ्यावी लागते. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींमध्ये काही विशिष्ट औषधोपचार केले जातात. अशा व्यक्तींनी दात आणि हिरड्यांची काळजी घेतल्यास हिरड्यांमधून रक्तस्राव होऊ शकतो. लाळेचे प्रमाण कमी झाल्याने दात किडायची शक्यता वाढते. या रुग्णांमध्ये हिरड्यांना सूज येण्याची शक्यता वाढते.

मधुमेह आणि दातांच्या आरोग्याचा विचार करताना पुढील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते.

- हिरड्यांचे विकार

- वारंवार तोंड येणे

- तोंडामधील जखम लवकर भरून येणे

- तोंडाची चव जाणे

- हिरड्या कमकुवत झाल्यास दात हलायला लागणे किंवा पडणे

यासाठी मधुमेही; तसेच उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी दात आणि हिरड्यांची काळजी ही सर्वसाधारण निरोगी व्यक्तींहून अधिक घेणे गरजेचे असते. स्त्री शरीरात गरोदर अवस्थेत अनेक बदल होत असतात. विविध संप्रेरके (हॉर्मोन्स) द्रव्यांचा परिणाम म्हणून हिरड्यांमध्ये सूज येऊ शकते. लाळेतील बदलांमुळे मौखिक आरोग्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते. गर्भधारणेचे निदान झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात प्राथमिक तपासणी करून दात आणि मुख- आरोग्याविषयी समुपदेशन हे अत्यंत आवश्यक असते. या कालावधीत दात स्वच्छ करून घ्यावेत आणि त्या व्यतिरिक्त आवश्यक ती चिकित्सा गर्भधारणेच्या चौथ्या ते सहाव्या महिन्यात करून घ्यावी. प्रसूतिपर्यंत कोणतीही दंतचिकित्सा ताणून धरू नये.


चोपडे दातांचा दवाखाना 

डेंटल इंप्लांट व रूट कॅनाल सेंटर,विजयनगर सांगली,

फोन  नंबर -: 📞९२०९६०९०९० 


Comments

Popular posts from this blog

डेंटल इम्प्लांट्स: तिसऱ्यांदा येणारे दात

हिरड्या मजबूत तर दात मजबूत