बाळाचे दुधाचे दात
बाळाचे दुधाचे दात १ . लहान बाळाला एकुण २० दुधाचे दात येतात.सहा महिन्यापासून एक वर्षांपर्यंत हे दात कधीही येऊ शकतात.मुले ३ ते ४ वर्षाची होईपर्यंत या दातांची वाढ सुरु असते. २ . खरे कायम दात यायला सुरुवात झाल्यावर दुधाचे दात हळूहळू पडू लागतात.सुरवातीला अंदाजे सहा वर्षापर्यंत पुढील खालचे दोन दात पडण्याची शक्यता असते.त्यानंतर प्रत्येक वर्षी मुलांचे दोन-चार दात सैल होतात व आपोआप पडतात.अंदाजे १० ते १३ वर्षांपर्यंत लहान मुलांचे संपुर्ण दुधाचे दात पडून जातात. ३. बाळ वर्षाचे झाल्यावर अथवा त्याला पहिला दात आल्यानंतर तुम्ही त्याची दंतवैद्याकडून तपासणी करु शकता.ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बाळाच्या दातांच्या स्वच्छतेबाबत व त्याच्या आहाराविषयी योग्य मार्गदर्शन मिळू शकते.कारण लहानपणीच मुलांच्या तोंडातील स्वच्छतेविषयी अधिक जागरुक राहणे गरजेचे असते. जाणून घ्या लहान मुलांचे दात काढल्यानंतर कशी घ्याल काळजी ? ४. दात यायला सुरुवात झाल्यानंतर हिरड्या शिवशिवणे,जास्त प्रमाणात लाळ सुटणे,कमी भुख लागणे व झोप न येणे या लक्षणांमुळे मुलं अस्वस्थ होतात.हाताचा अंगठा अथवा खेळणी चावल्या...