बाळाचे दुधाचे दात
बाळाचे दुधाचे दात
१. लहान बाळाला एकुण २० दुधाचे दात येतात.सहा महिन्यापासून एक वर्षांपर्यंत हे दात कधीही येऊ शकतात.मुले ३ ते ४ वर्षाची होईपर्यंत या दातांची वाढ सुरु असते.
२. खरे कायम दात यायला सुरुवात झाल्यावर दुधाचे दात हळूहळू पडू लागतात.सुरवातीला अंदाजे सहा वर्षापर्यंत पुढील खालचे दोन दात पडण्याची शक्यता असते.त्यानंतर प्रत्येक वर्षी मुलांचे दोन-चार दात सैल होतात व आपोआप पडतात.अंदाजे १० ते १३ वर्षांपर्यंत लहान मुलांचे संपुर्ण दुधाचे दात पडून जातात.
३. बाळ वर्षाचे झाल्यावर अथवा त्याला पहिला दात आल्यानंतर तुम्ही त्याची दंतवैद्याकडून तपासणी करु शकता.ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बाळाच्या दातांच्या स्वच्छतेबाबत व त्याच्या आहाराविषयी योग्य मार्गदर्शन मिळू शकते.कारण लहानपणीच मुलांच्या तोंडातील स्वच्छतेविषयी अधिक जागरुक राहणे गरजेचे असते. जाणून घ्या लहान मुलांचे दात काढल्यानंतर कशी घ्याल काळजी ?
४. दात यायला सुरुवात झाल्यानंतर हिरड्या शिवशिवणे,जास्त प्रमाणात लाळ सुटणे,कमी भुख लागणे व झोप न येणे या लक्षणांमुळे मुलं अस्वस्थ होतात.हाताचा अंगठा अथवा खेळणी चावल्याने त्यांना यातून आराम मिळतो.मात्र अस्वच्छ खेळणी अथवा न धुतलेली बोटे चावल्याने त्यांना डायरिया किंवा ताप येण्याची शक्यता असते.दात येत असल्यामुळे डायरिया किंवा ताप येतो हा एक गैरसमज आहे त्यामुळे याबाबतीत दुर्लक्ष करु नका.त्वरीत तुमच्या बाळाला तुमच्या डॉक्टरांकडे घेऊन जा. जाणून घ्या एका मिनिटात हटवा दातांचा पिवळेपणा
५. तुमच्या बाळाच्या दातांची योग्य निगा राखा.बाळाच्या जन्मापासून एक वर्षापर्यंत तुम्ही त्याच्या हिरड्या व दात स्वच्छ ओलसर रुमालाने पुसू शकता.बाळ वर्षाचे झाल्यावर त्याच्या दातांच्या स्वच्छतेसाठी एका सॉफ्ट ब्रशची निवड करा.
६. दोन वर्षांनंतर बाळासाठी पेडीयाट्रीक फ्लोरॉइड टुथपेस्ट Paediatric fluoride toothpaste(५०० पीपीएम) चा वापर करा.तुमच्या बाळाला चव समजू लागली की तसेच ते चुळ भरणे किंवा गुळण्या करायला शिकल्यावर (१००० पीपीएम) च्या फ्लोरॉइड टुथपेस्ट चा वापर करणे सुरु करा. ब-याच ठिकाणी पिण्याचे पाणी दूषित असते त्यामध्ये नैसर्गिक फ्लोराइड चे प्रमाण कमी असते. अश्या परिस्थितीत मुलांना वयाच्या सहा वर्षांपर्यंत फ्लोरॉइड टुथपेस्ट वापरणे गरजेचे असते. हे नक्की वाचा रात्रीही ब्रश करण्याची सवय कमी करेल या '5' समस्यांचा धोका !
७. बाळाला झोपेत स्तनपान अथवा बाटलीने दुध पाजू नका. कारण यामुळे ते दुध त्याच्या तोंडातील पोकळीत राहते.हे दुध त्यांच्या दातांमध्ये अडकून दात किडण्याची शक्यता असते. असे झाल्यास बाळाच्या तोंडातील वरचे पुढील दात खराब होतात.
८. वर्षातून दोनदा तुमच्या बाळाची नियमित तपासणी करुन घ्या.नियमित दंतवैद्याकडे तपासणी केल्याने मुलांमध्ये दात किडण्याची समस्या निर्माण होत नाही.दात किडल्यास किंवा दातांची योग्य निगा न राखल्यास काही मुलांना वारंवार डेंटिस्टकडे घेऊन जाणे गरजेचे असते.
चोपडे दातांचा दवाखाना
डेंटल इंप्लांट व रूट कॅनाल सेंटर,विजयनगर सांगली,
फोन नंबर -: 📞९२०९६०९०९०
Comments
Post a Comment