Posts

हिरड्या मजबूत तर दात मजबूत

Image
  हिरड्या मजबूत तर दात मजबूत दातांसोबत हिरड्यांचं आरोग्यही महत्वाचं असतं , यावर दातांचं आरोग्य अवलंबून असतं . सर्वात महत्वाचं म्हणजे दातांची मजबुती ही स्वच्छतेवर अवलंबून असते . हिरड्या अस्वच्छ असतील , यामुळे दात तुटणे , रक्त येणे अशा अडचणी येतात .  जेवण केल्यानंतर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर अनेक जण दात स्वच्छ करत नाहीत . निदान चुळ भरणे   तरी    आवश्यक असते , ते देखील अनेक लोक करत नसल्याने , दातांवर घट्ट स्तर निर्माण होतो .  दातांना कीड लागते या जंतुमुळे दातांना कीड लागते . याचा परिणाम हिरड्यांवर होतो . हिरड्या सुजतात , हिरड्यातून रक्त येते किंवा दात आणि हिरड्यांमध्ये अंतर तयार होतं . यासाठी दातांची समस्या उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा . वेळेवर उपचार न झाल्यास हिरड्यांमध्ये पु सुद्धा होऊ शकतो . कच्च्या भाज्या चावून खा हिरड्या मजबूत ठेवण्यासाठी कच्च्या भाज्या चावून खाव्यात . ' सी ' जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे , यामुळे हिरड्या मजबूत होतात .

बाळाचे दुधाचे दात

Image
  बाळाचे दुधाचे दात  १ . लहान बाळाला एकुण २० दुधाचे दात येतात.सहा महिन्यापासून एक वर्षांपर्यंत हे दात कधीही येऊ शकतात.मुले ३ ते ४ वर्षाची होईपर्यंत या दातांची वाढ सुरु असते. २ . खरे कायम दात यायला सुरुवात झाल्यावर दुधाचे दात हळूहळू पडू लागतात.सुरवातीला अंदाजे सहा वर्षापर्यंत पुढील खालचे दोन दात पडण्याची शक्यता असते.त्यानंतर प्रत्येक वर्षी मुलांचे दोन-चार दात सैल होतात व आपोआप पडतात.अंदाजे १० ते १३ वर्षांपर्यंत लहान मुलांचे संपुर्ण दुधाचे दात पडून जातात.   ३. बाळ वर्षाचे झाल्यावर अथवा त्याला पहिला दात आल्यानंतर तुम्ही त्याची दंतवैद्याकडून तपासणी करु शकता.ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बाळाच्या दातांच्या स्वच्छतेबाबत व त्याच्या आहाराविषयी योग्य मार्गदर्शन मिळू शकते.कारण लहानपणीच मुलांच्या तोंडातील स्वच्छतेविषयी अधिक जागरुक राहणे गरजेचे असते. जाणून घ्या लहान मुलांचे दात काढल्यानंतर कशी घ्याल काळजी ?   ४. दात यायला सुरुवात झाल्यानंतर हिरड्या शिवशिवणे,जास्त प्रमाणात लाळ सुटणे,कमी भुख लागणे व झोप न येणे या लक्षणांमुळे मुलं अस्वस्थ होतात.हाताचा अंगठा अथवा खेळणी चावल्याने त्यांना यातून आर

जाणून घ्या दात किडण्याची ही 10लक्षणे, तुमचेही दात किडलेले असू शकतात.

Image
  जाणून घ्या दात किडण्याची ही 10लक्षणे, तुमचेही दात किडलेले असू शकतात.  बऱ्याच लोकांना त्यांचे दात किडले आहेत हे दात दुखायला लागल्यावर किंवा डेंटिस्टकडे गेल्यावर समजते. दात किती किडले आहेत यावर त्यांचे दुखण्याचे प्रमाण अवलंबून असते. काही जणांचे दात किडले तरी दुखत नाहीत. कधीकधी सायनसप्रमणे गालाचा भाग किंवा कान दुखू लागतात. म्हणूनच जाणून घ्या दात किडण्याची ही 10 लक्षणे :   1) दातांवर पांढरे ठिपके पडणे – निरोगी दातांच्या वरच्या थरातील इनॅमलमुळे दातांचा रंग टिकून राहण्यास मदत होते. दात किडल्यावर या इनॅमलमधील कॅल्शियम निघून जाते आणि दातांवर पांढरे ठिपके पडण्यास सुरुवात होते. हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही.   2) अन्नकण दातांवर/दातांच्या फटींमध्ये अडकणे – दात किडण्याऱ्या लोकांमध्ये हे लक्षण बऱ्याचदा दिसून येते. कीड दोन दातांमधील फटींमध्ये पोकळी तयार करते. यामुळे अन्नाचे कण दातांत अडकतात. दातांमध्ये अशी पोकळी असेल तर दात स्वच्छ करताना फ्लॉस सहजपणे दोन दातांच्या फटींमधून फिरतो.   3) ठराविक दातांनी व्यवस्थित चावता न येणे – दात किडायला लागल्यानंतर दाताच्या आतमधील व आजूबाजूच्

डेंटल इम्प्लांट्स: तिसऱ्यांदा येणारे दात

Image
  डेंटल इम्प्लांट्स: तिसऱ्यांदा येणारे दात मनुष्याला नैसर्गिक रीत्या दोन वेळा दात येतात. एक म्हणजे दुधाचे आणि दुसरे म्हणजे कायमस्वरूपी दात. दुधाचे दात पाचव्या-सहाव्या वर्षी पडून त्या जागी कायमस्वरूपी दात येणार असले, तरी दुधाच्या दातांचीही काळजी घ्यावी लागते आणि तेवढीच काळजी येणाऱ्या कायमस्वरूपी दातांचीही घ्यावी लागते. मात्र सतत गोड खाणे, योग्य रीत्या दात न घासणे, चुकीच्या सवयी आदींमुळे दात किडू शकतात, पडू शकतात. अशा वेळी दातांवर योग्य उपचार करून घेणे आवश्यक ठरते. पूर्वी दात पडला, की कवळी बसवावी लागायची. काळाबरोबर दंतवैद्यकशास्त्राने प्रगती केली. परिणामी, कवळीऐवजी पडलेला दात क्राउन व ब्रिजेस पद्धतीने बसवला जाऊ लागला. मात्र हे उपचार घेताना आजूबाजूचे दात घासून क्राउन व ब्रिजेस करावे लागतात. परिणामी, बाजूचे दात कमजोर होण्याची शक्यता असते. कालांतराने या क्राउन व ब्रिजेसची जागा डेंटल इम्प्लांटने घेतली. जो दात पडला आहे, केवळ त्याच जागी आधुनिक उपचारांच्या साहाय्याने दाताचे रोपण (इम्प्लांट) केले जाते. आधुनिक प्रक्रियेने करण्यात येणाऱ्या दातांच्या रोपणामुळे रुग्णांना तिसऱ्यांदा दात मिळणे शक्य  झ

दातांची काळजी कशी घ्याल?

Image
  दातांची काळजी कशी घ्याल ?  दात किडणे , हिरड्यांची काळजी न घेणे यामुळे हिरड्यांतून रक्तस्रावाबरोबरच हिरड्यांना सूज येऊ शकते . मधुमेह आणि दातांच्या आरोग्याचा विचार करताना मात्र काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात . जोवर दाताचे दुखणे सुरू होत नाही , तोवर दातांची काळजी घ्यायची असते , ही संकल्पनाच मनात येत नाही . दातांची दैनंदिन काळजी घ्यावीच लागते ; परंतु वयानुसार ; तसेच विविध आजारपणांमध्ये दाताची विशेष काळजी घ्यावी लागते . उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींमध्ये काही विशिष्ट औषधोपचार केले जातात . अशा व्यक्तींनी दात आणि हिरड्यांची काळजी न घेतल्यास हिरड्यांमधून रक्तस्राव होऊ शकतो . लाळेचे प्रमाण कमी झाल्याने दात किडायची शक्यता वाढते . या रुग्णांमध्ये हिरड्यांना सूज येण्याची शक्यता वाढते . मधुमेह आणि दातांच्या आरोग्याचा विचार करताना पुढील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते . - हिरड्यांचे विकार - वारंवार तोंड येणे - तोंडामधील जखम लवकर भरून न येणे - तोंडाची चव जाणे - हिरड्या कमकुवत झाल्